कोल्हापूर : माथेरान नगरपरिषदेतील शिवसेनेच्या 10 नगरसेवकांनी 27 मे रोजी अचानक भाजपमध्ये प्रवेश करून खळबळ माजवली होती. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला आळा घालण्यासाठी शिवसेनेनेही जोरदार कंबर कसली आहे.
शिवसेनेतून भाजपात गेलेल्या ‘त्या’ बंडखोरांना शिक्षा देण्याकरिता पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्यासाठी पाऊले उचलण्यात आली आहे.
माथेरान शिवसेना गटनेते प्रसाद सावंत यांनी 10 नगरसेवकांच्या विरोधात 5 जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे सबळ पुराव्यानिशी याचिका दाखल केली होती. मात्र त्याच काळात जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाली. यामुळे त्या नगरसेवकांना दिलासा मिळाला होता.
हे ही वाचा : ज्या शिवसेनेनं केलाय घात, त्यांचा…; भाजप उमेद्वाराच्या प्रचारात रामदास आठवलेंची कवितेतून टोलेबाजी
दरम्यान, रायगडचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेले डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी या प्रकरणाची चौकशी करून यावर दृष्टिक्षेप टाकल्याने अनेक महीन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर 26 ऑक्टोबरला अंतिम सुनावणी होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते.
महत्वाच्या घडामोडी –
महाविकास आघाडीच्या दाबावातून साईलने आरोप केले असावेत; रामदास आठवलेंचा आरोप
मुजीब रेहमान, राशिद खानच्या फिरकीसमोर स्काॅटलंडचं लोटांगण; अफगाणिस्तानचा 130 धावांनी विजय
हिम्मत असेल तर समीर वानखेडेंवर कारवाई करुन दाखवा; नितेश राणेंचा इशारा