संजय राऊतांवर टीका करताना बंडखोर आमदार संजय शिरसाट यांची जीभ घसरली, म्हणाले…

0
441

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 व अपक्ष 10 आमदारांना सोबत घेऊन बंड केलं. आणि त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तर फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. यानंतर शिवसेना व शिंदे सरकारमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सूरू आहेत. अशातच शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

संजय राऊत हा मूर्ख माणूस आहे, त्यांना अजून राजकारण माहीत नाही. त्यांनी वर्तमानपत्र चालवावं, दुसरं काही करू नये, असा घणाघात संजय शिरसाट यांनी यावेळी केला. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हे ही वाचा : …तर मी ‘सिलव्हर ओक’वरही जायला तयार; शिंदे गटातील आमदार दीपक केसरकरांचं मोठं विधान

संजय राऊतांवर बोलणं मला खरंच योग्य वाटत नाही. त्या माणसानं उद्धवसाहेबांना छोटं केलं आहे. आता शिवसेना प्रमुखांना देखील छोटं करायचं काम राऊत करत आहेत. शिवसेना प्रमुख हे केवळ एका कुटुंबाचे नाहीत. ते केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे नेते आहेत. त्यांच्याबाबत जो सन्मान आहे, तो कमी करण्याचं काम संजय राऊत करत आहेत, अशी टीकाही संजय शिरसाट यांनी यावेळी केली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

राज ठाकरे-देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर एकनाथ खडसेंचं मोठं विधान, म्हणाले….

औरंगाबादचं संभाजीनगर होणारच, नामांतराला स्थगिती नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट

मी राज ठाकरेंना भेटायला गेलो तर कोणाला मळमळायचं कारण काय?; देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here