वरळीतून पराभवाची जाणीव झाल्यामुळे, आदित्य ठाकरेंनी ठाण्याला….; मनसेचा टोला

0
150

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली. याच हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी काढलेल्या जन प्रक्षोभ मोर्चात आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आवाहन दिलं होतं.

मी ठाण्यातून निवडणूक लढवणार आणि जिंकूनही दाखवणार, असे खुले आव्हान त्यांनी दिले आहे. त्या आव्हानाला मुख्यमंत्र्यांनीही जशास तसे उत्तर दिलं. यावर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरेंना वरळीतून निवडून न येण्याची जाणीव असल्यामुळेच ठाण्याला पळून जाण्याचा प्रयत्न तर चालू नाही ना? असा प्रश्न उपस्थित करत संदीप देशपांडेंनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला. देशपांडेंनी ट्विट करत हा टोला लगावला आहे.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! काँग्रेसने ‘या’ बड्या नेत्यावर केली थेट निलंबनाची कारवाई

वरळीतील जनता सेटिंग लावून निवडून गेलेल्या आमदारावर नाराज आहे.आपण पुन्हा वरळीतून निवडून येणार नाही याची जाणीव झाल्यामुळे ठाण्याला पळून जाण्याचा प्रयत्न तर चालू नाहीना ???, असं देशपांडेंनी ट्विटमध्ये म्हटलं.

महत्त्वाच्या घडामोडी 

पुणे पोटनिवडनुकीसाठी महाविकास आघाडीकडून ‘या’ तीन नावांची जोरदार चर्चा

“देवेंद्र फडणवीस मोठ्या मनाचे, ठाकरेंनी माफी मागितल्यास ते माफ करतील”

फडणवीसांचा ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यांसह अडीचशे कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here