Home महाराष्ट्र “अमरावतीचे पालिका आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर यांच्यावर रवी राणा समर्थकांनी फेकली शाई”

“अमरावतीचे पालिका आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर यांच्यावर रवी राणा समर्थकांनी फेकली शाई”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अमरावती : अमरावतीतील शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला आहे. यावरून अमरावतीती राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर आमदार रवी राणा यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी महाराजांचा पुतळा का हटवला म्हणून अमरावतीचे पालिका आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेक केली.

हे ही वाचा : संजय राऊत म्हणाले, मुंबईचा दादा शिवसेनाच; आता देवेंद्र फडणवीस, म्हणतात…

डाॅ.प्रवीण आष्टीकर यांच्यावर दुपारी दीड वाजणेच्या सुमारास 3 महिलांनी शाई फेकल्याची घटना घडली. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी चौघा जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यात 2 महिलांचाही समावेश आहे.

नेमकं काय घडलं ते वाचा सविस्तर :

डॉ. प्रवीण आष्टीकर हे पालिकेच्या आवारात आज दुपारी अधिकारी आणि सुरक्षा रक्षकासोबत कचऱ्याची पाहणी करत होते. त्यादरम्यान हा प्रकार घडला. ओपन स्पेस असल्याने या ठिकाणी 2 महिला आल्या. त्यांना सुरक्षा रक्षकाने अडवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात एका महिलेने आपल्या पिशवीतून एक बॉटल काढली. त्यात काही तरी असल्याचं लक्षात आल्यानं आष्टीकर सतर्क झाले अन् ते जीवाच्या आकांताने पळाले. आयुक्त एका रिक्षाच्या मागे जात असतानाच एका महिलेने त्यांना घेरले अन् बिसलेरीची बाटली भरून आणलेली शाई आयुक्तांच्या अंगावर ओतली. त्यामुळे सुरक्षा रक्षकाने तेवढ्यात धाव घेऊन आयुक्तांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. या सुरक्षा रक्षकाने आयुक्तांना लहान लेकरासारखं कवटाळून धरत या महिलांपासून त्यांचा बचाव केला. त्यानंतर या महिला धावतच पळून गेल्या. तसेच जाताना या महिलांनी जय भवानी, जय शिवाजीचे नारे दिले.

महत्वाच्या घडामोडी –

कर्नाटक सरकारचा हिजाबला परवानगी देण्यास नकार; तर ओवेसी म्हणतात…

…तरी राज्यातलं सरकार आमच्या ताब्यातच राहणार; नवाब मलिकांचा फडणवीसांना टोला

“ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा फक्त शिवसेना आहे, दुसरं कोणी नाही”