दुबई : आजच्या आयपीएलच्या सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा 88 धावांनी पराभव केला.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 विकेट गमावत 220 धावा केल्या. हैदराबादकडून वृद्धिमान साहाने 45 चेंडूत 87 धावा, कर्णधार डेव्हिड वाॅर्नरने 34 चेंडूत 66 धावा तर मनीष पांडेने 31 चेंडूत नाबाद 44 धावा केल्या. तर दिल्लीकडून नाॅर्त्झ आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ 20 षटकात सर्व गडी गमावत 131 धावाच करू शकला. दिल्लीकडून रिषभ पंतने 35 चेंडूत 36 धावा, तुषार देशपांडेने 9 चेंडूत नाबाद 20 धावा, अजिंक्य रहाणेने 19 चेंडूत 26 धावा, तर शिमरन हेटमायरने 13 चेंडूत 16 धावा केल्या. हैदराबादकडून राशिद खानने 3, संदीप शर्मा व टी.नटराजनने 2 तर विजय शंकर, शाहबाज नदीम, जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी-
उद्धव ठाकरेंसाठी राणे हा संपलेला विषय असल्यामुळे…; शिवसेनेची नारायण राणेंवर टीका
दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय
भाजप सोडून कुणीही जाणार नाही- गिरीश महाजन
हे दसऱ्याचं भाषण होतं की शिमग्याचं?; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला