मुंबई : नवी दिल्लीतील लोधी रोडवरील सीबीआय मुख्यालयात गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीवरून आता राजकारण पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी भाजपावर निशाणा साधलाय.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, “राफेलच्या चौकशीची आग फ्रान्समध्ये लागली आणि दिल्लीतल्या CBI कार्यालयातून धूर निघाला. कुछ तो गडबड है., असं रूपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.
दरम्यान,भारताला विक्री केलेल्या 59 हजार कोटी रुपयांच्या 36 राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहारातील कथित भ्रष्टाचाराची आणि वशिलेबाजीची फ्रान्सने न्यायालयीन चौकशी सुरू केल्याचे वृत्त ‘मीडियापार्ट’ या फ्रान्सस्थित शोध पत्रकारिता संकेतस्थळाने शुक्रवारी दिले. त्यानंतर काँग्रेस आणि भाजप यांच्यात पुन्हा आरोप-प्रत्यारोपांना तोंड फुटले आहे.
राफेलच्या चौकशीची आग लागली फ्रांस मध्ये आणि दिल्लीतल्या CBI कार्यालयातून धूर निघाला. कुछ तो गडबड है……
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) July 8, 2021
महत्वाच्या घडामोडी –
खडसे प्रकरणात मी काय बोलणार, मी ईडीचा प्रवक्ता नाही; फडणवीसांचं मोठं वक्तव्य
“राणेंना केंद्रीय गृहमंत्री केलं तरी शिवसेनेला फरक पडत नाही”
“सरकारचं अपयश झाकण्यासाठी केंद्रातील मंत्रीच नाही, तर पंतप्रधान मोदींनाही बदलण्याची गरज”
मुंडे भगिनी नाराज नाहीत, अकारण बदनामी करू नका- देवेंद्र फडणवीस