नवी दिल्ली : हैदराबादमधल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे संसदेत पडसाद उमटले आहेत. बलात्काऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात येईल, असं आश्वासन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलं आहे.
हे कृत्य अमानवीय आहे. सरकार यावर चर्चेसाठी तयार आहे. अशा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी संसदेत सहमती होत असेल तर त्यावर सरकार तरतूद करायला तयार आहे, असं बलात्काऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देऊ, अशी घोषणा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केली.
फक्त कायद्यांनी काही नाही होणार, आधीच अनेक कडक कायदे आहेत. यासाठी राजकारण सोडून एकत्र येऊन काम केलं पाहिजे, असं मत राज्यसभेचे सभापती वैंकेया नायडू व्यक्त केलं आहे.
दरम्यान, संसदेच्या दोन्ही सभागृहातील भाजप, सपा, काँग्रेस, टीएमसीसह सर्व पक्षाच्या नेत्यांनी यावर आपला रोष व्यक्त केला.