मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. यावरुन विरोधकांनी रावसाहेब दानवेंना चांगलंच धारेवर धरलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
‘दानवे यांचं हे वक्तव्य तथ्यहीन आहे. शेतकरी आंदोलन करत असताना असं बोलायला नको होतं. पण ते मी असं बोललोचं नाही’, असं स्पष्टीकरण नंतर ते देतील, असा टोला अजित पवारांनी यावेळी लगावला आहे.
केंद्र सरकारनं हटवादीपणा सोडायला हवा.केंद्र सरकारच्या कायद्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. केंद्रीय मंत्री शेतकऱ्यांची चर्चा करतात पण तोडगा निघत नाही. हा कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचा नाही, त्यामुळे आधीचाच कायदा कायम ठेवावा, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
माझा हक्काचा संगीतकार गेला, अरारारा खतरनाकऽऽऽऽऽ आता पुन्हा होणे नाही- प्रविण तरडे
तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; शिर्डीत फटाके फोडून जल्लोष
शक्ती कायदा सर्वांसाठीच एकसमान, मग ते…; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
दानवेंनी पुरावे द्यावेत, केंद्राने सर्जिकल स्ट्राईक करावा- संजय राऊत