“रावसाहेब दानवेंची बुद्धी भ्रष्ट, मोदींना बैल म्हणणं हा पंतप्रधान पदाचा अपमान”

0
475

रत्नागिरी : बैलगाडा शर्यतीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांंमध्ये चांगलाच गाजत आहे.

रावसाहेब दानवेंची या व्हिडीओत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना जीभ घसरली आहे. दानवे यांनी राहुल गांधी यांना काम न करणारा बैल असं म्हटलं. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काम करणारा बैल असंही म्हटलं. यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया देत दानवेंवर हल्लाबोल चढवला.

रावसाहेब दानवे यांची बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बैल म्हणाले आहेत. हा पंतप्रधानपदाचा अपमान आहे, त्यामुळे दानवेंची मोदी सरकार मधून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी विनायक राऊत यांनी यावेळी केली.

दरम्यान, भाजपच्या नेत्यांना मस्ती आली आहे. त्यांच्या बुद्धीची विकृती या मस्तीमुळेच दिसून येत आहे. राजकीय व्यक्तींना सांड असा उल्लेख करणे हे बुद्धी भ्रष्ट झाल्याचंच लक्षण आहे, असा हल्लाबोल विनायक राऊतांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

नवनीत राणा यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा ठोकणार- यशोमती ठाकूर

माझी निष्ठा केवळ शिवसेनेशी; एकनाथ शिंदेंचे राणेंना प्रत्युत्तर

परमेश्वराने ठाम भूमिका घेतल्यानेच करोना आणि पूर आला; विश्वजित कदमांचं अजब वक्तव्य

“सामनाचं नाव आता पाकिस्ताननामा किंवा बाबरनामा करा”; शेलारांची संजय राऊतांवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here