“रावसाहेब दानवेंना घरात घुसून चोपलं पाहिजे”

0
252

मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. यावरुन विरोधकांनी रावसाहेब दानवेंना चांगलंच धारेवर धरलं आहे. यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केल्याचं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं. तसंच, त्यांना घरात घुसून फटकवायला हवं, असं म्हणत बच्चू कडूंनी दानवेंवर हल्लाबोल केला आहे. गेल्या वेळी जेंव्हा रावसाहेब दानवे यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं, तेव्हा आम्ही त्यांच्या घराला घेराव घातला होता. पण आता परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे., असंही बच्चू कडू यांनी म्हटलं.

दरम्यान, सध्याची परिस्थिती पाहता आता तर रावसाहेब दानवेंच्या घरात घुसून त्यांना चोपलं पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“रावसाहेब दानवेंचं वक्तव्य तथ्यहीन; शेतकरी आंदोलन करत असताना त्यांनी असं बोलायला नको होतं”

माझा हक्काचा संगीतकार गेला, अरारारा खतरनाकऽऽऽऽऽ आता पुन्हा होणे नाही- प्रविण तरडे

तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; शिर्डीत फटाके फोडून जल्लोष

शक्ती कायदा सर्वांसाठीच एकसमान, मग ते…; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here