“रावसाहेब दानवे हिंदुस्थानचे आहेत की पाकिस्तानचे यासाठी त्यांचा डीएनए तपासणं गरजेचं आहे”

0
322

मुंबई : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना देशभरातून विरोध केला जात आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असताना केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा यावेळी केला आहे. यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्व देशभरात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु असून पाठिंबा मिळत आहे. अशामध्ये शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे म्हणणं हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. रावसाहेब दानवेच हिंदुस्थानचे आहेत की पाकिस्तानचे यासाठी डीएनए तपासणं गरजेचं आहे, असं म्हणत बच्चू कडूंनी दानवेंना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचं निधन”

शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात; रावसाहेब दानवेंचं धक्कादायक वक्तव्य

“सुपारीबाज आंदोलकांना मोदी भीक घालणार नाहीत”

मतदारांनी भाजपला जागा दाखवली; कुठलीही पालिका निवडणूक लढवा, पराभव निश्चित- सचिन सावंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here