रणजित बोत्रे यांची सीना स्टार जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड

0
7

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : विद्यार्थ्यासाठी नवनवीन उपक्रम, नाविन्यपूर्ण नवोपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांना धाराशिव जिल्ह्यातील सीना स्टार यांच्याकडून जीवन गौरव पुरस्कार देऊन गुणगौरव करण्यात येणार आहे.

या जीवन गौरव पुरस्कारासाठी पुण्यातील गोखलेनगर गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील उपक्रमशील शिक्षक रणजित बोत्रे यांची निवड झाली आहे.

बोत्रे नेहमीच प्रशालेत विद्यार्थ्यांकरिता सातत्याने नवनवीन उपक्रम राबवीत असतात. माझा कोपरा,एक पुस्तक आनंदाचे, दगडावरील रंगकाम, प्रयोग छोटे – विज्ञान मोठे, कोलाज काम, बाल लेझीम पथक,काथ्यापासून वस्तू बनवणे, वारली चित्रे, फनी गेम्स, वर्ग सजावट, पणतीवर रंगकाम असे नाविन्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण नवोपक्रम त्यांनी शाळेत आजवर राबविलेले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात भारतानं घेतले पाच सर्वात मोठे निर्णय

‘दहशतवाद्यांशी एकटा भिडला, बंदूक हिसकावली अन्…’, कोण आहे? हल्ल्यात मारला गेलेला सय्यद हुसैन शाह

…म्हणून मी वाचलो; कुटुंबासोबत पहलगाममध्ये गेलेल्या प्राध्यापकाने सांगितला थरारक अनुभव

गोपाळकृष्ण शाळेचा गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here