आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर भाजपकडून सातत्यानं मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमचे जुने सहकारी राणे साहेब यांनाही अटक करण्यात आली होती. त्यांना मंत्रिमंडळातून कमी करण्याचा निर्णय तुम्ही घेतला हे माझ्या पाहण्यात आलं नाही. उद्या पंतप्रधान पुण्यात येतील तेंव्हा ते कदाचित याचा खुलासा करतील, असा टोला पवारांनी यावेळी भाजपला लगावला.
हे ही वाचा : “राज्यपाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम करत आहेत”
दरम्या, एक न्याय राणेंना लावता अन् दुसरा न्याय मलिकांना लावता याचा अर्थ, हा सर्व राजकीय उद्देशाने सुरू केलेला उद्योग आहे, अशी जोरदार टीकाही शरद पवारांनी यावेळी भाजपवर केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट; कोणत्या विषयांवर चर्चा?
‘सरकार जेवायला बोलावतं आणि ताटात काही नसतं’; एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन सदाभाऊ खोतांची टीका
“भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे ओबीसी आरक्षणाचे मारेकरी”