आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेला हल्ला प्रकरणी आज भाजपाचे आमदार नितेश राणे यांना कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नितेश राणे बुधवारी कणकवली कोर्टात शरण आले, त्यानंतर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राणेंवर निशाणा साधलाय.
एका कार्यक्रमासाठी गुलाबराव पाटील हे चोपडा येथे आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना नितेश राणेंच्या पोलीस कोठडीबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “ते महासंत आहेत, 1008 महामंडलेश्वर राणे आहेत. त्यांची आरती केली पाहिजे”.
हे ही वाचा : सर्वात जास्त पिणारी मंडळी भाजपमध्येच आहेत; नवाब मलिकांचं जोरदार प्रत्युत्तर
दरम्यान, कोर्टाने त्यांना येत्या 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारी पक्षातर्फे दहा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली गेली होती. कोर्टाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरु झाली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, ‘त्या’ आमदारांना रस्त्यात तुडवा, संजय राऊतांनी सांगितली जुनी आठवण
“दु:खद बातमी! कोरोनामुळं शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याचं निधन”
“मनसेत इनकमिंगचा जलवा, मानखूर्द येथील शेकडो मुस्लिम तरूणांनी हाती धरला मनसेचा झेंडा”