आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निकाल लागले आहेत. भाजपने 19 पैकी 10 जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला केवळ पाच जागा मिळाल्या आहेत. अजून मतमोजणी सुरू असून इतर जागा कुणाच्या पारड्यात जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हे ही वाचा : शिवसेनेचा भाजपाला मोठा धक्का; भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश
जिल्हा बँकेवर केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचं वर्चस्व निर्माण झालं आहे. या विजयानंतर राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष सुरू केली आहे.आता कसं वाटतंय… गार गार वाटतंय… अशा घोषणा भाजप कार्यकर्त्यांनी द्यायला सुरुवात केली आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. तर भाजपचे विठ्ठल देसाई विजयी झाले आहेत. या ठिकाणी दोघांनाही समसमान मते मिळाली होती. त्यामुळे चिठ्ठीद्वारे झालेल्या प्रक्रियेत त्याठिकाणी देसाई यांना विजयी घोषित करण्यात आलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेनेत पक्षप्रवेशाचं वादळ; अनेक युवा कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”
“नितेश राणेंच्या अडचणीत वाढ, राणेंचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला”