मुंबई : शिवसेनेनं संजय राऊत यांच्यावर अन्याय केला आहे, असं वक्तव्य मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी केलं आहे. ठाण्यातील एका कार्यक्रमाप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यात संजय राऊत यांचा मोठा वाटा आहे. शिवसेनेची भूमिका त्यांनी जोरदारपणे मांडली होती. पण पक्षानं त्यांच्यावर अन्याय केला. त्यांना किमान ‘सामना’च संपादकपद तरी मिळाायला हवं होतं, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.
सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची नियुक्ती झाली ही चांगलीच बाब आहे. पण हे पद संजय राऊत यांना मिळायला हवं होतं, असं मत आठवलेंनी व्यक्त केलं.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे असते तर चित्र वेगळं दिसलं असतं, असंही रामदास आठवले म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
फडणवीस सरकारच्या काळात घोषणा होऊनही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही- रोहित पवार
पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय- धनंजय मुंडे
भाजपला संपवण्याची तयारी आजपासून सुरू – शरद पवार
कुत्रा पिसळतो तसा हा पिसळलाय; निलेश राणेंची विनायक राऊतांवर आक्षेपार्ह टीका