“रामदास आठवले साहेब, राष्ट्रपती व्हावेत ही माझी मनापासून इच्छा”

0
528

मुंबई : रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी, रामदास आठवले हे राष्ट्रपती व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

राष्ट्रपती हे आपल्या देशातील सर्वोच्च स्थान असलेलं पद आहे, आणि त्यामुळे साहेब राष्ट्रपती व्हावेत ही माझी इच्छा आहे, असं सीमा आठवले यांनी म्हटलं आहे. त्या एका डिजिटल माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

दरम्यान, रामदास आठवले हे सध्या मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. ते ज्यावेळी राज्यमंत्री झाले, त्यावेळी आम्हांला आनंदच झाला होता. पण, आता ते कॅबिनेट मंत्री व्हावेत आणि पुढच्या 10 ते 15 वर्षात ते राष्ट्रपती व्हावेत ही माझी मनापासूनची इच्छा आहे, अशी इच्छा सीमा आठवले यांनी यावेळी व्यक्त केली.

महत्वाच्या घडामोडी –

“नारायण राणेंना पंतप्रधान केलं, तरी शिवसेनेला दु:ख वाटण्याचं कारण नाही”

…तर मी विधानसभा अध्यक्ष होण्यास तयार, पण शिवसेनेनं वनमंत्रीपद सोडू नये- भास्कर जाधव

मी काही मोठी नेता नाही, त्यामुळे भाजपला मला संपवायचं आहे, असं वाटत नाही- पंकजा मुंडे

“मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सर्व भाजप नेत्यांना देवेंद्र फडणवीसांनी संपवलं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here