रामदास आठवले मुर्ख आहेत, तळवे चाटूनच त्यांनी पदं मिळवलीत- आनंदराज आंबेडकर

0
470

मुंबई : बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम त्यांच्या नातवांमुळेच अडलं आहे, अशा आशयाचं विधान रामदास आठवले यांनी केलं होतं. त्यावर आज आनंदराज आंबेडकर यांनी रामदास आठवले यांच्यावर टीका केली.

रामदास आठवले मुर्ख आहेत. त्यांचा मुर्खपणा सगळ्या जगाला ठावूक आहे.  तळवे चाटूनच त्यांनी पदं मिळवलीत, असा आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी रामदास आठवलेंवर केला आहे.

आठवलेंना मी कधीही नेता मानलेलं नाही. जे सत्तेत येतील त्यांचे तळवे चाटण्या पलिकडे या माणसाने काहीही केलेलं नाही. त्यांना जे नेता समजतात ते मुर्खांच्या नंदनवनात जगतात, असंही आनंदराज आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, रामदास आठवलेंनी इंदू मिलचं कसं चाललं आहे हे बघावं. नंतर त्यांनी बोलावं. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्हावं, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असंही आनंदराज आंबेडकर यांनी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

निलेश राणे यांनी केली विनायक राऊतांवर आक्षेपार्ह पोस्ट

इंग्लंडच्या खेळाडूंनी केली पाकिस्तानची धुलाई; एकाच सामन्यात इंग्लंडच्या दोन फलंदाजांंची शतकी खेळी

“संधी मिळताच जनता पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकवते”

स्टेट बँक ऑफ इंडियाची कर्ज होणार स्वस्त; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here