Home पुणे “रामदास आठवले म्हणजे आंबेडकर चळवळीला लागलेला कलंक”

“रामदास आठवले म्हणजे आंबेडकर चळवळीला लागलेला कलंक”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना शरद पवारांचं उत्तर, म्हणाले…

रामदास आठवले म्हणजे आंबेडकरी चळवळीला लागलेला कलंक आहे, अशी घणाघाती टीका आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे. आनंदराज आंबेडकर यांनी आज कोरेगाव भीमा विजयस्तंभाला अभिवादन करत येथील तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी रामदास आठवलेंवर टीका केली.

दरम्यान, आंबेडकरांनी यावेळी बोलताना केंद्र सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकार ओमिक्रॉनची भीती दाखवून निवडणुका पुढे ढकलू पाहत असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच ओमिक्रॉनचा धोका जास्त नसल्याने या वर्षीचा शौर्य दिन हा लाखोंच्या संख्येच्या जनसमुदायाने संपन्न होणार असल्याचं सांगतानाच कोरोना हा अजिबात गंभीर विषाणू नाही. त्यामुळे भीमा कोरेगावला मोठ्या संख्येने या, असं आवाहन आंबेडकरांनी यावेळी केलं.

महत्वाच्या घडामोडी –

आधी राज ठाकरेंचा मलम,आता नितीन गडकरींचं बटण चर्चेत; गडकरींनी लावलं कार्यकर्त्याच्या जॅकेटचं बटण

उद्धव ठाकरे आजारी आहेत तोपर्यंत देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करा- रामदास आठवले

शाळा, महाविद्यालये सुरू राहणार की बंद; आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…