आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. रिपाईनंही आगामी महापालिका निवडणूकीसाठी जोरदार कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे किमान 25 नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार करून कामाला लागण्याचे आवाहन रिपाई नेते व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना केलं.
हे ही वाचा : निवडणुका सगळ्याच एकत्र घ्या किंवा… ; अजित पवारांचं रोखठोक मत
ईशान्य मुंबईत 1992 च्या पालिका निवडणुकीत रिपाईचे 7 नगरसेवक निवडून आले होते. तर संपूर्ण मुंबईत रिपाइंचे 12 नगरसेवक त्याकाळात निवडून आले होते. रिपब्लिकन पक्ष आता केवळ बौद्धांचा आणि एका जातीचा राहिला नसून सर्व जाती धर्मियांचा झाला आहे., असं आठवले म्हणाले. रिपाइंने विक्रोळी येथे ईशान्य मुंबई जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी रामदास आठवले कार्यकर्त्यांशी बोलत होते.
झोडपट्टीवासीयांचे, गरिबांचे, नोकरीचे, घराचे प्रश्न सोडविण्यात रिपब्लिकन पक्ष अग्रेसर आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजप-आरपीआय युती होणार असून सत्ता आल्यास पहिली अडीच वर्षे रिपाइंचा उपमहापौर तर भाजपचा महापौर होईल. तसेच नंतरची अडीच वर्षे रिपाइंचा महापौर होईल, असं भाजप सोबत ठरलं असल्याचे आठवले यांनी यावेळी सांगितलं.
महत्वाच्या घडामोडी –
निवडणुकीआधी काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध गुन्हा दाखल
शिवसेनेचे नगरसेवक कॉंग्रेसचा झेंडा घेऊन निवडणूक रिंगणात; चर्चांना उधाण
संजय राऊत यांच्याविरोधात भाजपा नगरसेविकांनी केली तक्रार दाखल