Home महाराष्ट्र भाजपाच्या निर्णयावर रामदास आठवले नाराज; म्हणाले…

भाजपाच्या निर्णयावर रामदास आठवले नाराज; म्हणाले…

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगानं विधान परिषद निवडणूक जाहीर केली आहे. भाजपने आपले चार उमेदवार घोषित केले. यावर  पक्षातील ज्येष्ठ नेते नाराज असताना आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात 21 मे रोजी विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होत असून त्यातील एक जागा भाजपाने रिपब्लिकन पक्षाला द्यावी अशी रिपाइंची मागणी होती. मित्रपक्ष म्हणून भाजपाच्या वाट्याला येणाऱ्या चार जागांपैकी एक जागा रिपाइंला न सोडल्याने रिपाइं कार्यकर्ते नाराज आहेत, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपाच्या केंद्रीय समितीने नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके , डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अजित गोपछडे, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि गोपीचंद पडळकर या चार नावांची घोषणा केली. या चौघांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जही दाखल केले.

महत्वाच्या घडामोडी-

त्या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही; विधान परिषद उमेदवार निवडीवर पंकजा मुंडेंनी सोडल मौन

सगळे नेते राजकारण बाजूला ठेवून एकवटल्यामुळे माझा आत्मविश्वास दुणावला- उद्धव ठाकरे

शिवरायांच्या महाराष्ट्रात लष्कराची गरज नाही- उद्धव ठाकरे

“करोनाचं संकट गंभीर असलं तरीही सरकार खंबीर आहे”