Home महाराष्ट्र लोकल ट्रेनचा फायदा नक्की कोणाला? सर्वसामान्य जनतेला की…; राम कदमांची टीका

लोकल ट्रेनचा फायदा नक्की कोणाला? सर्वसामान्य जनतेला की…; राम कदमांची टीका

मुंबई : 1 फेब्रुवारीपासून काही ठराविक वेळेत सर्वांसाठी रेल्वेसेवा सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यावरुन भाजपा नेते राम कदम यांनी सरकारला राज्य सरकारवर टीका केली आहे.

महाराष्ट्र सरकारने जर मुंबई लोकल सुरू करण्याचा निर्णय पाच महिन्यांपूर्वी घेतला असता तर लाखो लोकांना होणारा त्रास वाचला असता. हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या त्यादेखील वाचल्या असत्या. पण सरकारच्या निष्काळजीपणामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, असं राम कदम म्हणाले.

दरम्यान, मंदिरं उघडण्याआधी बार उघडण्यासाठी परवानगी देणारं सरकार सामान्य प्रवाशांना रात्री साडे नऊनंतर लोकल प्रवासासाठी परवानगी देत आहे. साडे नऊनंतर लोकल ट्रेनचा फायदा नक्की कोणाला? सर्वसामान्य जनतेला की बारवाल्यांना? असा सवाल करत राम कदम यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय.

महत्वाच्या घडामोडी-

रामाच्या नावाने चंदा हाच भाजपाचा धंदा- सचिन सावांत

“राज ठाकरेंचा अयोध्येला जाण्याचा निर्णय योग्य, सगळ्यांनीच अयोध्येला गेलं पाहिजे, मी सुद्धा जाणार”

मनसेने आतापर्यंत कितीवेळा भूमिका बदलली आहे, हे राज ठाकरेंनाही सांगता येणार नाही- सचिन सावंत

आपल्या अहंकारासाठी केंद्र सरकार अजून किती शेतकऱ्यांचा बळी घेणार?- बाळासाहेब थोरात