राजू शेट्टींची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी; आशिष शेलारांचा टोला

0
342

सांगली : कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात सुरू होणाऱ्या किसान आत्मनिर्भर यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोणीही आमच्या बालेकिल्ल्यात आले तरी काही फरक पडणार नाही, असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलं होतं. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते सांगलीतील किसान आत्मनिर्भर यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

राजू शेट्टी यांची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाली आहे, असं म्हणत आशिष शेलार यांनी राजू शेट्टी यांना टोला लगावला आहे.

दरम्यान, 70 च्या दशकात आलेल्या पिंजरा या चित्रपटातील आदर्श शिक्षकाला एका मोहापायी तमाशाच्या फडात तुणतुण घेऊन उभं रहाव लागतं. तशी अवस्था राजू शेट्टींची झाली असल्याचं शेलार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“मोठी बातमी! प्रियांका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात”

EWS च्या लाभ देण्याने मराठा आरक्षणास धक्का लागल्यास राज्य सरकार जबाबदार- संभाजीराजे

मैक्सिकोच्या बीचवर कंगणाचा बिकीनी अवतार, चाहत्यांकडून शिव्यांचा भडीमार

“सेटलमेंट झाल्यावर समर्थन कसं करायचं यासाठी शिवसेनेला भारतरत्न दिलं पाहिजे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here