मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं राज्यात थैमान घातलं होतं. या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपले प्राणही गमावले. परंतु मागील काही दिवसांपासून लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे कोरोनाच्या या भीषण परिस्थितीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भूमिका अत्यंत महत्वाची मानली गेली.
कोरोना संकटाच्या काळात राजेश टोपे यांच्या आई गंभीर आजारी होत्या. अशावेळी आईच्या आरोग्याची काळजी घेत टोपे सातत्यानं कामात व्यस्त होते. याच दरम्यान त्यांच्या आईचा मृत्यू झाला. मात्र, खचून न जाता टोपे यांनी आपली भूमिका सार्थपणे निभावली आहे. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत राजेश टोपेंचं काैतुक केलं आहे.
राजेश टोपे हे डॉक्टर नाही ते इंजिनिअर आहेत. टोपे यांना कोणतीही जबाबदारी दिली तरी ते चांगलं काम करतात. मात्र, कोरोनाच्या काळात टोपे यांनी जे काम केलं ते कौतुकास्पद आहे., अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी राजेश टोपेंचं काैतुक केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“लाचखोरी प्रकरणातील शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांचं अखेर निलंबन”
“सत्तेच्या लालसेपोटी ठाकरे सरकारला हिंदू सणांचाही विसर”
महाविकास आघाडी सरकार भूईसपाट होईल ; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य
यंदाही दहीहंडीबाबत निर्बंध कायम; ठाकरे सरकारचे गोविंदा पथकांना आवाहन