मुंबई : राज्यातील अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्ष भाजपने आवाज उठवला आहे. त्यासाठी पुर्ण वेळ अधिवेशन घेण्याची मागणी राज्य सरकारकडे केली. मात्र राज्य सरकारने दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी भाजप कार्यकारणी बैठकीत सरकारवर निशाणा साधलाय.
मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे, असं म्हणत पोलीस विभागातील वाझे तर सापडला मात्र अन्य विभागातील वाझेचा पत्ता आम्हाला लागला म्हणून पावसाळी अधिवेशन दोन दिवसाचं करण्याचा निर्णय या सरकारने घेतला असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासातील ठाकरे सरकार हे भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार, अत्याचाराने बरबटलेलं आहे. कोणत्याही सरकारमध्ये 1 मुख्यमंत्री असतो मात्र या सरकारमध्ये प्रत्येक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजत आहे. एखादा निर्णय घेतला जातो मात्र काही तासाभरात तो रद्द होतो आणि दुसऱ्यादिवशी नवीन निर्णय घेतला जातो. सरकार आहे की सर्कस, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“जितेंद्र आव्हाडांची नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली दूर; काढला ‘हा’ तोडगा”
राज्यातील महाविकास आघाडी सरकार शिवशाही सरकार नसून, बेबंदशाही सरकार आहे”
ठाकरे सरकार कायद्याने चालत नाही हे राष्ट्रपतींना कळवा- देवेंद्र फडणवीस
“उद्धव ठाकरे पाच वर्षाचा कालावधी पुर्ण करतील असं शरद पवार म्हणालेत”