दुबई : आयपीएलचा आजचा सामना चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध राजस्थान राॅयल्स यांच्यात खेळला सामन्यात राजस्थान राॅयल्सने चेन्नई सुपर किंग्सचा 16 धावांना पराभव केला.
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टाॅस जिंकून प्रथम फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला. राजस्थान राॅयल्सने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 216 धावा केल्या. राजस्थानकडून संजू सॅमसन आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने अर्धशतकी खेळी केली. संजु सॅमसनने सर्वाधिक 74 धावा केल्या. यात तब्बल त्याने 9 गगनचुंबी षटकार मारले. स्मिथनेही 69 धावांची खेळी केली. जोफ्रा आर्चरने अवघ्या 8 बॉलमध्ये 4 षटकारच्या मदतीने नाबाद 27 धावा केल्या. चेन्नईकडून सॅम करनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर दीपक चहार, लुंगी एन्गिडी आणि पियूष चावला या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
धावांचा पाठलाग करताना चेन्नईने आक्रमक सुरूवात केली. शेन वाॅट्सन व मुरली विजय या दोघांनी पहिल्या विकेटसाठी केवळ 6.4 षटकात 56 धावांची भागदारी केली. परंतु मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात शेन वाॅट्सन आऊट झाला. वाॅट्सनने 21 चेंडूत 33 धावा केल्या. वाॅट्सनपाठोपाठ मुरली विजयही आऊट झाला. विजयने 21 धावा केल्या. तर ड्यू प्लेसिस एक बाजू सांभाळून संघाला विजयापर्यंत नेत होता. दरम्यान, 19 व्या षटकात ड्यू प्लेसिस आऊट झाला. आणि चेन्नईच्या आशा संपुष्टात आल्या. ड्यू प्लेसिसने 37 चेंडूत 72 धावा केल्या. ज्यात त्याने 1 चाैकार व 7 षटकार लगावले.
दरम्यान, राजस्थानकडून राहूल टेवाटियाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
महत्वाच्या घडामोडी-
“…तर आज शरद पवारांना उपवास घोषित करावा लागला नसता”
99 टक्के शिवसैनिकांना संजय राऊत खटकतात- निलेश राणे
मराठा आरक्षणावरून शरद पवारांनी सोडलं माैन; म्हणाले…