राजन पाटील कोण आहेत?
सोलापूर जिल्ह्यातील अनुभवी आणि प्रभावशाली स्थानिक राजकीय नेते.अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहिल्यानंतर अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश.
मोहोळ- आनगर
परिसरात त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे दीर्घकालीन राजकीय वर्चस्व.अनगर नगर पंचायतीमध्ये त्यांच्या कुटुंबाचा ठसा कायम.
———————————————–
अनगर नगर पंचायत निवडणूक का गाजली?
सर्वच सदस्य बिनविरोध निवडून येणे हीच मोठी राजकीय घटना ठरली.सरपंच पदासाठी भाजपने प्राजक्ता पाटील (राजन पाटील यांची सुन) यांना उमेदवार केले.
राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून उज्ज्वला थिटे यांनी अर्ज दाखल केला.मात्र, उज्ज्वला थिटे यांचा अर्ज छाननीत बाद झाला.यामुळे वादाला पेटला
अजित पवार–राजन पाटील संघर्ष कसा उफाळला?
अर्ज बाद झाल्यानंतर पाटील समर्थकांचा जल्लोष झाला.यावेळी राजन पाटील यांचे पुत्र बाळराजे (विक्रांत) पाटील यांनी अजित पवारांना उद्देशून जोरदार विधान केले—
“अजितदादा, सर्वांचा नाद करा पण अंनगर च्या लोकाचा नाद करू नका !”
हे विधान झपाट्याने व्हायरल झाले आणि वाद राज्यभर गाजू लागला.
————————————————————-
राजन पाटील यांची प्रतिक्रिया व माफी
प्रकरण तीव्र होताच राजन पाटील पुढे आले.त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार व पवार कुटुंबीयांची माफी मागितली.
“माझा मुलगा नवीन आहे, अनुभव कमी आहे” असे त्यांनी सांगितले.
———————————————————
मोहोळ विकासावरून आरोप
काही स्थानिक कार्यकर्त्यांनी आरोप केला की—अंनगर येथे मोठे निधी प्रामुख्याने राजन पाटील यांच्या प्रभावामुळे मिळाले.
मोहोळ शहर मात्र विकासात मागे पडले.या मुद्द्यावरूनही वातावरण चांगलेच ढवळून निघाले.
वादाचे व्यापक राजकीय महत्त्व
अंनगर नगरपंचायत निवडणूक ही स्थानिक असली तरी,ती भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार) या सत्तासंघर्षातील एक महत्त्वाचा टप्पा ठरली.
राजन पाटील यांच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यस्तरीय राजकीय समीकरणांवर परिणाम झाला.
अर्ज बाद, जोरदार विधाने, माफी — या सर्व घटनांनी सोलापूर विभागातील राजकारण ढवळून निघाले.
————————————-
राजन पाटील हे मोहोळ–अंनगर –वैराग परिसरातील प्रभावशाली नेते आहेत. अंनगर ग्रामपंचायतीतील वाद आणि त्याभोवतीच्या राजकीय घटना हा परिसरातील नवा सत्तासंघर्ष दर्शवतात. भाजप प्रवेशानंतर त्यांचे महत्त्व अधिक वाढले असून आगामी काळात त्यांच्या राजकारणाचा प्रभाव नक्कीच मोठा असेल.

