मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता कठोर निर्णय घेतले पाहिजेत असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे बोलत होते.
सुरुवातीच्या वेळी काही गोष्टी मी त्यांना सुचवल्या. त्यातल्या काही गोष्टी झाल्या तर काही झाल्या नाहीत. नंतर काही गोष्टी करायला घेतल्या पण उशीर झाला होता. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे याआधी अशी परिस्थिती कोणासमोर आली नव्हती. त्यामुळे राज्य किंवा केंद्र सरकारला काय करायचं हे कळत नव्हतं. पण आता ज्या गोष्टी झाल्या पाहिजेत त्या होताना दिसत नाही. आपण नोकरशाहीवर किती अवलंबून राहत आहोत याचा विचार झाला पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रात काय घडत आहे याचा अंदाज घेणं आणि लोकांना सांगणं गरजेचं आहे. दोन तास काय दुकानं उघडी ठेवताय, पूर्ण दिवस ठेवा ना. झुंबड झाली की नियमांचं पालन होत नाही म्हणतात. हा कुठला थिल्लरपणा आहे. सुरुवातीला काही गोष्टी बऱ्य़ा वाटल्या पण आता ठाम निर्णय घेणं गरजेचं आहे. लॉकडाउन कधी आणि कसं काढणार हे लोकांना सांगणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी मुख्यमंत्र्यांनी यावं असंच काही नाही इतरजण येऊनही सांगू शकतात, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुटला; ‘या’ दिवशी होणार विधान परिषद निवडणुका
संजय राऊत यांनी मानले केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाचे आभार
उद्धव ठाकरेंचा साधेपणा आणि नम्रपणा पाहून भारावला बिहारचा आमदार; ऑडिओ क्लिप व्हायरल
“एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये”