राज ठाकरे यांची पिलावळ मला फोन करून धमकी देत आहेत – गुणरत्न सदावर्ते

0
160

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : टोलच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच पेटलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टोलमाफीच्या विधानानंतर राज ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेतली. यानंतर मनसैनिक आक्रमक झाले. राज ठाकरे यांनी तर स्वत: टोलनाके जाळण्याचा इशारा दिला. यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी थेट राज ठाकरे यांच्या विरोधात जाऊन पोलीस तक्रार केली आहे.

ही बातमी पण वाचा : “पंतप्रधान नरेंद्र मोदींना आताच हिमालयात पाठवा, देशाचं भलं होईल”

राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करा, आणि त्यांना अटक करा, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. यावरून मनसैनिक पुन्हा एकदा आक्रमक झाले असून गुणरत्न सदावर्तेंना धमकीचे फोन येऊ लागले.

यावर सदावर्ते यांनी भाष्य केलं आहे. राज ठाकरे यांची पिलावळ मला फोन करून धमकी देत आहेत. मला महाराष्ट्रात फिरु देणार नाहीत, अशी धमकी देत आहेत, असं सदावर्ते यांनी सांगितलंय.

महत्त्वाच्या घडामोडी – 

टोलच्या मुद्द्यावरुन मनसेनंतर काँग्रेसही आक्रमक: केली ‘ही’ महत्वाची मागणी

भाजप हा भारतीय जनता पक्ष नसून हा तर…; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

मोठी बातमी! वंचित बहुजन आघाडी, इंडिया आघाडीसोबत जाण्यास तयार – प्रकाश आंबेडकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here