पिंपरी चिंचवड : लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना आलेल्या वाढीव वीजबिलावरोधात मनसे आक्रमक झाली आहे. पुण्यातील शिरुरमध्ये असलेले एमएसईबीचे कार्यालय फोडल्याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. 12 दिवसानंतर त्यांची सुटका झाल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांचं काैतुक केलं आहे.
वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन करताना ‘एमएसईबी’चे कार्यालय फोडणाऱ्या मनसैनिक सुशांत कुटे यांना राज ठाकरे यांनी फोन केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याचे कौतुक करताना आत्मचरित्राची पानं वाढली, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
काय झाला संवाद?
राज ठाकरे : जय महाराष्ट्र
सुशांत कुटे : जय महाराष्ट्र, ते आंदोलन झालं, रविवारी सुटलो आम्ही
राज ठाकरे : बरं, चला अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं
सुशांत कुटे : नांदगावकर साहेबांनी खूप मदत केली, घरच्यांना फोन वगैरे केला, सगळ्यांशी बोलले
राज ठाकरे : हो न?
सुशांत कुटे : हो, आणि तुमचंही लक्ष होतं, त्यांनी सांगितलं.. गणपतीमुळे काय भेट नाही झालं
राज ठाकरे : काय त्रास नाही न झाला?
सुशांत कुटे : नाही साहेब, त्रास नाही झाला, बारा दिवस लागले तिथे फक्त
राज ठाकरे : हा ते ठीक आहे, आत्मचरित्राची पानं वाढली
सुशांत कुटे : हाहाहा, तुमचा आशीर्वाद आहे साहेब. बाकी काय
राज ठाकरे : शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना
सुशांत कुटे : गणपती झाल्यावर भेटायला येतो
राज ठाकरे : हो या
महत्वाच्या घडामोडी-
अनलॉक-4 च्या गाईडलाईन्सची घोषणा; ‘हे’ सुरू होणार
नरेंद्र मोदींवर चित्रपट बनवणाऱ्या संदीप सिंहचा भाजप संबंध तपासा; गृहमंत्र्यांचे सीबीआयला निवेदन
अभिनेता सुशांत सिंह राजपूतला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर