आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराविरोधात निषेध म्हणून सोमवारी सत्ताधारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. या बंदला महाराष्ट्रातील व्यापारी संघटनांनी याला विरोध केला. आता मनसेने देखील महाराष्ट्र बंदला विरोध केला आहे.
लखमीपुर खेरी येथे घडलेली घटना निषेधार्त आहे त्याचा आपण निषेध करावा तेवढा कमीच आहे. आम्हीही त्या घटनेचा निषेध करतो. परंतु महाराष्ट्रात सरकारच्या पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यामागे नेमका काय उद्देश आहे हे समजले नाही. आधीच कोरोनामुळे गेले दीड दोन वर्ष व्यापारीवर्ग मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. आता कुठे काही प्रमाणात सर्व सुरळीत सुरू झाले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना हा महाराष्ट्र बंद परवडणारा नाही. अशी माहिती यशवंत किल्लेदार यांनी दिली.
दरम्यान, निषेध करायचा असेल तर अन्य पर्याय आहेत त्याचा अवलंब करावा. मात्र बंद का? सरकारच बंद करणार असेल तर आमचे गाऱ्हाणे मांडायचे तरी कोणाकडे? या बंदमध्ये सहभागी न होता व्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावून आपली दुकाने चालु ठेवावीत, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेने घेतली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपाचे इनकमिंग सुरू; ‘हे’ दोन बडे नेते करणार भाजपामध्ये प्रवेश
शेतकऱ्यांना चिरडलं, प्रियांका गांधींना रोखलं, उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हा- अशोक चव्हाण
भाजपने माझी किंमत 100 कोटी ठरवली याचा मला आनंद- नवाब मलिक
पुण्यात मनसे करणार आंदोलन; ‘या’ कारणासाठी राज ठाकरे मैदानात