“राज ठाकरेंची मॅच फिक्स असते, शिवसेनेच्या नेत्याला बोलल्यावर तुम्हांला का मिरच्या झोंबल्या”

0
1092

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात आज जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना राज ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपच्या खासदार नवनीत राणा व रवी राणा यांच्यावरही राज ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला.

मातोश्री हे हनुमान चालिसा म्हणायला काय मशीद आहे का?, असा सवाल राज ठाकरेंनी केला. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत, रवी राणा, नवनीत राणा हे लडाखमध्ये एकत्र भेटले होते. यावरूनही राज ठाकरेंनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. यावरून आता रवी राणा यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

राज ठाकरेंची मॅच फिक्स असते, तुम्ही किती आधी भूमिका बदलल्या ते आधी बघा, असा जोरदार पलटवार रवी राणांनी यावेळी केला.

हे ही वाचा : “आता थोड्याच वेळात गरजणार राजगर्जना; राज यांच्या सभेआधीच वसंत मोरे यांचं बाईकवरून शक्तीप्रदर्शन”

मातोश्री हे मशीद नाही हे आम्हांला माहीत आहे. पण मातोश्री हे हिंदुचे श्रद्धास्थान आहे. तिथं हनुमान चालिसा वाचायचा प्रयत्न केला म्हणून राजद्रोह होऊ शकत नाही. तसेच महाराष्ट्राबाहेर एखादा नेता भेटल्यावर त्यांच्यासोबत बोलणं हा गुन्हा नाही., त्यामुळे राज ठाकरे तुम्हांला मिरची झोंबण्याचं कारण नाही, असा टोला रवी राणांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

मनसेत झारीतील शुक्राचार्याचा शोध घ्यायला हवा; राज यांच्या सभेपूर्वीच वसंत मोरेंचा गंभीर आरोप

‘…पण राज ठाकरेंच्या पुण्याच्या मेळाव्यात वसंत मोरेंना खुर्ची मिळेल का?’; शिवसेनेचा सवाल

“शिवसेनेची मोठी खेळी; राज ठाकरेंच्या सभेदिवशीच मनसेचे तब्बल ‘इतके’ पदाधिकारी हाती बांधणार शिवबंधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here