मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाली. मात्र लगेच रात्री उशिरा त्यांचा जामीन मंजूरही झाला. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. आता या प्रकरणामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
सर्व गोष्टी चालूच आहेत की. नारायण राणेंच्या विरोधात जे झालं, यांच्या हाणामाऱ्या सुरु आहेत. बाकीच्या सगळ्यांचे मेळावे सुरु आहेत. भास्कर जाधव यांच्या मुलाने मंदिरात जाऊन अभिषेक केला. म्हणजे यांच्यासाठी मंदिरं सुरु, बाकीच्यांनी मंदिरात जायचं नाही. यांनी मेळावे, सभा घ्यायच्या पण आम्ही दहीडंही साजरी करायची नाही. कुठूनही गर्दी कमी झालेली दिसत आहे का?, असा प्रश्न राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, मैदानांमध्ये क्रिकेट, फुटबॉल खेळत आहेत. महापौर बंगल्याजवळ सरकारकडून कामं करुन घेण्यासाठी येणाऱ्या बिल्डरांच्या गाड्या काही कमी झालेल्या नाहीत. मग सणांवरच का निर्बंध येतात? असाही सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याचं वक्तव्य
“नागपूरमध्ये शिवसेनेला धक्का! शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश”
महाराष्ट्रात जे काही घडतंय ते सर्व राजकीय सूडबुध्दीने- नवाब मलिक