“अंधेरीची निवडणूक ‘राज ठाकरेंनी’ एकहाती जिंकली”

0
387

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानंतर भाजपने अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून माघार घेतली. भाजपचे उमेदवार मुरली पटेल यांनी शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतला. त्यांच्या माघारीमुळे ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग जवळपास निश्चित मानला जात असून भाजपने माघार घेतल्याचे श्रेय सर्वस्वी राज ठाकरे यांचे असल्याचा दावा मनसे नेत्यांकडून केला जात आहे.

हे ही वाचा : शिंदेंसोबत गेलेले अनेक आमदार उद्धव ठाकरेंकडे पुन्हा येणार?; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने खळबळ

‘राजसाहेब ठाकरेंनी अंधेरीची निवडणूक एकहाती जिंकली’, असं मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अमेय खोपकर यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं असून खोपकर यांच्या या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

आमदार संजय शिरसाट यांच्या प्रकृतीबाबत, डाॅक्टरांनी दिली ‘ही’ मोठी अपडेट, म्हणाले…

“राष्ट्रवादीची यशस्वी खेळी; भाजपच्या ‘या’ नेत्यांनी हाती बांधलं घड्याळ”

“देवेंद्र फडणवीसजी, पत्रास कारण की…, मनसेचं पुन्हा एकदा फडणवीसांना पत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here