“राज ठाकरेंचा राजकीय गेम होईल, तेंव्हा त्यांना शिवसेनेशिवाय कोणीही दिसणार नाही”

0
1022

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कोल्हापूर : राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसे भाजप विरूद्ध शिवसेना यांच्यात जोरदार राजकारण सुरू आहे. अशातच आता शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

राज ठाकरे हे आपला पक्ष वाचविण्यासाठी नवनवीन भूमिका मांडत आहेत. पहिला त्यांनी मनसेचा झेंडा बदलविला. त्यानंतर त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. आता त्यांनी आपला मोर्चा हिंदुत्वाकडे वळविला आहे. मात्र याचा फायदा घेऊन त्यांचा राजकीय गेम करण्यात येईल. त्यावेळी त्यांना शिवसेनेशिवाय कोणीही दिसणार नाही, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

हे ही वाचा : मुंबई पोलिसांच्या नोटीसीवर वकील गुणरत्न सदावर्तेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान, नीलम गोऱ्हे या कोल्हापूर दाैऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

महत्वाच्या घडामोडी –

“राज ठाकरेंना कोण कशाला इजा करेल, त्यांना भिती वाटत असेल तर संरक्षण दिलं पाहिजे”

“बाळा नांदगावकर आणि राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी”

भाजपच्या 28 प्रमुख नेत्यांची प्रकरणं बाहेर काढणार; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here