आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त फेसबुक पोस्ट केल्यामुळे अभिनेत्री केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर केतकीला पोलिसांनी चौकशीसाठी नवी मुंबईतून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता तिला अटक करण्यात आली आहे. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी याबाबत ट्विट केलं आहे.
कोणी तरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काही तरी श्लोकासारखं लिहून फेसबूकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काही तरी भावे वगैरे असं नाव टाकलं आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो., असं राज ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा : सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असता, तर आज तुम्ही…; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्षे कार्यरत असलेल्या शरद पवारांविरुद्ध तिनं किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुद्धीही आपण ओळखतो… तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत…! आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि राहतील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवर घालायला पाहिजे., असंही राज ठाकरे म्हणाले.
चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरुषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धिमान विचारवंतानी आपल्याला शिकवलं! कोणीही ह्या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये हीच अपेक्षा!
पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्ती ह्या खरंच आहेत की नवा वाद उकरून काढण्यासाठी कोणाची तरी उठाठेव सुरू आहे हेदेखील तपासणे गरजेचे आहे. कारण ह्या अशा चार-दोन विकृत टाळक्यांमुळे समाजासमाजामध्ये तेढ निर्माण होते, समाज दुभंगतात. द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे हे आता राज्यकर्त्यांना समजलं असेलच. हे सगळं महाराष्ट्रात वेळीच आवरणं गरजेचं आहे; कारण महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. म्हणूनच, राज्य सरकारनं ह्याचा नीट छडा लावून ह्या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा.
आपला नम्र
राज ठाकरे
कोणीही महाराष्ट्राची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये, हीच अपेक्षा! pic.twitter.com/hnngbIwQaW
— Raj Thackeray (@RajThackeray) May 14, 2022
महत्वाच्या घडामोडी –
शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजेत; छगन भुजबळ संतापले
खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष आपल्यासोबत होता, त्यामुळे…; उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
कोण आहे नवनीत राणा?, त्या…; विद्या चव्हाण यांची जीभ घसरली.