“मास्क का वापरायचा नाही याचं ठोस कारण राज ठाकरेंनी सांगावं”

0
185

मुंबई : मराठी भाषा दिना दिवशी मनसेने शिवाजी पार्कवर एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी त्या कार्यक्रमामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या तोंडावर मास्क लावलं नव्हतं. तेव्हा पत्रकारांनी त्यांना तुम्ही मास्क का लावत नाही असा सवाल केला. यावर मी मास्क घालतच नाही, असं उत्तर राज ठाकरेंनी दिलं. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरेंबद्दल काय बोलणार ते मनसे पक्षाचे नेते आहेत. पण मास्क का वापरत नाहीत याचं त्यांनी ठोस विश्लेषण करणं गरजेचं आहे. मास्क हीच खरी लस आहे., असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान वारंवार हेच सांगत आहे. त्याचं खरं पालन करणं गरजेचं आहे. वैद्यकीय कारण काय आहे?, हे त्यांनी सांगितलं पाहिजे. ते सुद्धा कलाकार आहेत, जाणकार आहेत. लोकांचे नेते आहेत. त्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे असंही संजय राऊतांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

…नाहीतर काही लोक स्वत:साठी मागतात; उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंना अप्रत्यक्ष टोला

राज्यात राजकारणाचं गुन्हेगारीकरण सुरू, कुणालाच कुणाचा धाक उरला नाही- चंद्रकांत पाटील

अन् चांगला फटका मारल्यानंतरही सिब्लीला व्हावे लागले दुर्दैवीरित्या बाद; पहा व्हिडिओ

“मराठा आरक्षणासाठी उद्या जालनामध्ये आक्रोश मेळावा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here