भाजपच्या ‘या’ नेत्याने घेतली राज ठाकरेंची भेट; भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

0
304

मुंबई :  भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवास्थानी कृष्णकुंजवर जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी  दोन्ही नेत्यांमध्ये बैठकही झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आशिष शेलार यांनी आज संध्याकाळी राज ठाकरे यांच्या दादर येथील ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.  राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

ही मैत्रीपूर्ण भेट असल्याची माहिती देण्यात मिळाली आहे.  याआधीही आशिष शेलार आणि विनोद तावडे यांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतलेली होती.

दरम्यान, या बैठकीमध्ये राज्यातील सध्याचे राजकीय चित्र आणि राज यांची येत्या काळात ठरणारी भूमिका यावर चर्चा झाल्याचं समजतंय.

महत्वाच्या घडामोडी-

-दिल्लीत बसलेला तो शेंबडा मुलगा गतीमंद आहे- शरद पोंक्षे

-प्रकाश आंबेकडर यांना मुंबई पोलिसांची नोटीस

-राजकारणात कोणही विश्वास ठेवण्या योग्य राहिलं नाही, राजकारणाचं नुसतं भजं झालंय- मकरंद अनासपूरे

-संजय राऊत यांचा ट्वीटवरून भाजपवर निशाणा, म्हणातात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here