मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट झाल्यानंतर मनसे-भाजप युती होणार, अशी चर्चा राज्यात सुरू होती. यावर चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
मनसेसोबत युतीचा निर्णय मी एकटा घेणार नाही. आमचा पक्ष यासंदर्भात निर्णय घेईल. मनसेसोबत युती ऑन द स्पाॅट होणार नाही. या युतीमुळे देशाच्या राजकारणावर परिणाम होणार आहे. त्यामुळे मनसेसोबत युती करण्याआधी केंद्राची परवानगी घेणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, राज ठाकरे हे माझे आवडते राजकीय व्यक्तिमत्व आहे. ते बरं बोलत नाही तर खरं बोलतात. त्यांनी मला क्लिप पाठवली. ती मी ऐकली. येत्या एक दोन दिवसात राज ठाकरे यांची भेट होणार आहे. तेंव्हा मी माझ्या मनातले प्रश्न मांडणार आहे, असं देखील चंद्रकांत पाटलांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
मुख्यमंत्र्यांच्या दाैऱ्याला जेवढा खर्च, कोकणातील पूरग्रस्तांना तेवढीही मदत नाही; निलेश राणेंची टीका
राज्यात अनेक संकटे आली, पण उद्धव ठाकरेंनी हिंमत दाखवली; शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांचं काैतुक
संजय राऊत, तुम्हाला सेना भवनच्या आत नेवून फटके टाकणार; निलेश राणेंचा हल्लाबोल