आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या काल ठाण्यात झालेल्या उत्तरसभेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत पंतप्रधआन मोदींचे कौतुक करताना उत्तर प्रदेशातील विकासावर देखील भाष्य केलं. या पार्श्वभूमीवर मनसे ही भाजपाची सी टीम असल्याची टीका महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सुरू झाली आहे. या टीकेवर आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं.
“राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यानंतर मनसे भाजपाची बी टीम असल्याचं खोटं महाविकास आघाडी आपल्या इको-सिस्टिमच्या माध्यमातून पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व असून ते कधीही कोणाची बी टीम म्हणून काम करणार नाहीत.” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
हे ही वाचा : भाऊ दवाखान्यात दाखल झाल्याचं कळताच दोन्ही बहिणी धावल्या; तब्बेतीची केली विचारपूस
राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असून ते कधीही कोणाची बी टीम म्हणून काम करणार नाहीत❗️#Maharashtra #BJP #RajThackrey #maharashtranavnirmansena pic.twitter.com/ZGkofOMZxd
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 13, 2022
दरम्यान, खोटं पसरवण्यासाठी महाविकास आघाडीने इको सिस्टिम सुरू केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचे वेगवेगळे नेते समान खोटं बोलून ते खरं कसं आहे हे जनतेला भासवून देण्याचा प्रयत्न या इको-सिस्टिमच्या माध्यमातून करत आहेत, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
खोटं पसरविण्यासाठी महाविकास आघाडीने इको-सिस्टीम सुरु केली आहे❗️#Maharashtra #MVA #NCP #ShivSena #Congress pic.twitter.com/4yez6qz8X0
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 13, 2022
महत्वाच्या घडामोडी –
गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
मोठी बातमी : ठाण्यातील सभेनंतर राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल
“शिवसेनेचा भाजपला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”