आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे.
3 मेपर्यंत सगळ्या मस्जिदीच्या मौलावींशी बोलून घ्या, सर्व मस्जिदीवरील भोंगे उतरवायला सांगा. आमच्याकडून 3 तारखेनंतर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही, असं म्हणत राज यांनी सरकारला डेडलाईन दिली. त्यानंतर राज ठाकरेंवर आणि मनसेवर इतर पक्षातील नेते टीका करत आहेत. अशातच पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती होणार असल्याचं पोस्टर लागलं असून त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती होणार असून सामूहिक हनुमान चालिसा पठण केलं जाणार आहे. संध्याकाळी ६ वाजता ही आरती होणार आहे. महत्वाचं म्हणजे या पोस्टरवर राज ठाकरेंचा उल्लेख हिंदुजननायक असा करण्यात आला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मनसेला भाजपसोबत घेणार का?; चंद्रकांत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…
शरद पवारांनी महाराष्ट्राची माफी मागावी; मनसेची आक्रमक मागणी
“उद्या ठाकरे सरकारमधील आणखी एक घोटाळा बाहेर काढणारच; रिचेबल झाल्यानंतर सोमय्या उद्या बाॅम्ब फोडणार?”