Home महाराष्ट्र “राज ठाकरेंनी दिला आजोबा प्रबोधनकार ठाकरेंच्या आठवणींना उजाळा”

“राज ठाकरेंनी दिला आजोबा प्रबोधनकार ठाकरेंच्या आठवणींना उजाळा”

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  आज केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांचा जयंतीनिमित्ताने सर्व स्तरांवरून त्यांना अभिवादन केले जात आहे. मनसेचे  अध्यक्ष राज ठाकरे हे प्रबोधनकार यांचे नातू आहेत. राज ठाकरे यांनीही आजोबांच्या आठवणींना उजाळा दिला.

लेखणी, वाणी आणि कृतीला तलवारीसारखं परजून मराठी माणसाचा स्वाभिमान जागवण्याचे, चेतवण्याचे ऐतिहासिक कार्य आमच्या आजोबांनी, प्रबोधनकार ठाकरे यांनी केले. ‘ऊठ मऱ्हाठ्या ऊठ’, अशी ऐक्याची हाळी त्यांनी घातली. तत्कालीन राजकीय, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात आपल्या रोखठोख विचारांनी स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवला. कडव्या मराठी विचार-संस्कृतीचे भाष्यकार प्रबोधनकार ठाकरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन!, असं  राज ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

2024 ला पण तुम्ही देशाचे पंतप्रधान व्हावं; कंगणा रणाैतकडून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा

धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ वकतव्याकडे मी निव्वळ विनोद म्हणून पाहते; प्रीतम मुंडेंचा टोला

“पुण्यात अजित पवारांनी भाजपची डोकेदुखी वाढवली?; अनेक नगरसेवक संपर्कात असल्याचा केला दावा”

‘सध्या भाजपा तणावग्रस्त आहे म्हणून…’; नाना पटोलेंची टीका