“बाळा नांदगावकर आणि राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी”

0
246

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिशिदीवरील भोंगांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. अशातच आज मनसे नेते बाळा नांदगावकर आणि राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. यावेळी मुस्लीम संघटनांकडून माझ्यासह राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून याबाबत गृहमंत्र्यांना माहिती दिल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे.

हे ही वाचा : भाजपच्या 28 प्रमुख नेत्यांची प्रकरणं बाहेर काढणार; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

मशिदीवरील भोंग्यांना विरोध केल्यामुळे मनसेच्या नेत्यांना मुस्लीम संघटनांकडून धमक्या दिल्या जात आहेत. माझ्या कार्यालयात नुकतंच एक पत्र आलं आहे. ज्यामध्ये मला आणि राज ठाकरेंना जीव मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हे धमकीचं पत्र मी गृहमंत्र्यांकडे दिलं आहे. त्यानंतर गृहमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना याबाबत सूचना दिल्या आहेत, असं बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

तुरूंगात दणके बसले नाहीत, याबद्दल सरकारचे आभार माना; बच्चू कडूंचा राणा दाम्पत्याला टोला

योगी आदित्यनाथ म्हणाले, आम्ही मुंबईत उत्तर भारतीयांसाठी कार्यालय उभारणार, आता आदित्य ठाकरे म्हणतात…

“हिंदुत्वाचा खरा वारसदार कोण, हे लवकरच कळेल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here