आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : वाढती महागाई व लाॅकडाऊननं आधीच सर्वसामान्य जनता त्रासलेली असतानाच वाढीव वीज बिलानेही सर्वसामान्यांचे कंबरडं मोडलं आहे. तसेच बेस्ट कंपनीकडूनही ग्राहकांना वाढीव वीज बिल पाठवण्यात आल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहिलं आहे.
वीज दरवाढीविरोधात मुंबईत वीजदर कमी न झाल्यास आम्हाला शेवटी न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशाराही राज ठाकरे यांनी आयुक्तांना पत्रात दिला आहे.
हे ही वाचा : ममता बॅनर्जींच्या भेटीनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
मुंबईतील विद्युत दर निश्चितीकरता बेस्ट उपक्रमाने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे गेल्या दहा वर्षांमध्ये सादर केलेल्या आर्थिक ताळेबंदात दरवर्षी दाखवलेली 3 हजार कोटी रुपये ते 3 हजार 500 कोटी रुपये इतकी रक्कम किंवा खर्च संशयास्पद आहे. ही बाब आम्ही बेस्टच्या अर्थसंकल्पीय अंदाज अहवालांमधील आकडेवारीच्या पुराव्यांनिशी आपल्यासमोर सिद्ध करत असल्याचे राज ठाकरे यांनी या पत्रात नमूद केलं आहे.
दरम्यान, आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची खरी उत्तर आम्हाला मिळाली आणि त्यासंदर्भात बेस्टने योग्य उपाययोजना केल्या कर वीजेचे दर कमी होऊन मुंबईकरांवर असलेल्या बिलाच्या रकमेचा बोजा 15 ते 20 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. या संदर्भात योग्य ती पावले उचचली गेली नाही, तर न्यायालयात दाद मागू, असा इशाराही राज ठाकरेंनी आयुक्तांना दिला आहे.
‘बेस्ट’ उपक्रमाचे फसवे खर्च व आकडेवारी; तसंच ‘बेस्ट’चे विद्युत दर कमी करण्याबाबत मनसेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त श्री. इक्बालसिंह चहल यांना लिहिलेले पत्र पक्षाचे नेते श्री. बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने आयुक्तांना भेटून दिले. pic.twitter.com/sZEFdrfZ3V
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) December 1, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“काँग्रेस हाच भाजपला सक्षम पर्याय; भाजपविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढली पाहिजे”
ठाकरे सरकारकडून दोन वर्षांत दबाव आणि दडपशाहीचं राजकारण; भाजपची टीका
…म्हणून रामदास आठवलेंनी घेतली अमित शहांची भेट