प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता…; राज ठाकरे संतापले

0
7

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या परिसरातील उभारण्याता आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा? मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, त्याची तपासणी वैगरे काही केली होती का नव्हती? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

ही बातमी पण वाचा : “महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही”

पुतळे, स्मारकं ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हणलं होतं की, महाराजांचं खरं स्मारक, हे कुठला तरी भव्य पुतळा नसून, त्यांचे गड-किल्ले हे आहेत. पण महाराजांच्या नावाने राजकारण करायचं, मतं मागायची, सत्ता मिळवायची, आणि मग स्मारकांची टेंडर काढायची, त्यातून काही मिळतंय का, हे बघायचं इतकंच राहिलं आहे.

ही प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उध्वस्त केली पाहिजे. आणि तसं घडलं, तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, राज ठाकरे यांनी कुसुमाग्रजांच्या शहरातील ‘पाच पुतळ्यांवरची’ कविताही पोस्ट केली आहे.”मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले ज्योतिबा म्हणाले , शेवटी मी झालो फ़क्त माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले , मी फ़क्त मराठ्यांटचा आंबेडकर म्हणाले ,मी फक्त बौद्धांचा. टिळक उद़्गारले ,मी तर फ़क्त, चित्पावन ब्राम्हणांचा. गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला, आणि ते म्हणाले , तरी तुम्ही भाग्यवान. एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती!”

महत्त्वाच्या बातम्या –

समृद्ध जीवन मल्टिस्टेटमधील गुंतवणुकदारांचे पैसे परत घेण्यासाठी जनसंघर्ष समितीचा ३० रोजी आंदोलनाचा इशारा

कोल्हापुरात भाजपला मोठं खिंडार; हा मोठा नेता करणार पक्षाला रामराम?

आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत…; राज ठाकरेंच्या महाराष्ट्र सैनिकांना थेट सूचना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here