मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना एका अश्लील चित्रपटाच्या चित्रिकरणावरुन अटक करण्यात आली आहे.
राज कुंद्रा यांच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहे. अशातच माॅडेल शर्लिन चोप्रा हिनं राज कुंद्रावर काही खळबळजनक आरोप केले आहेत. शर्लिनने आपला जबाब मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या प्राॅपर्टी सेलला दिला आहे.
ईटाइम्सच्या अहवालानुसार, शर्लिनने एप्रिल 2021 मध्ये राज कुंद्रावर लैंगिक अत्याचाराची एफआयआर दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शर्लिनने या प्रकरणात 2019 चा उल्लेख केला आहे.
पोलिसांना दिलेल्या निवेदनात शर्लिननं म्हटलं आहे की, राज कुंद्राने माझ्या बिझनेस मॅनेजरला प्रपोजलसाठी बोलावलं. 27 मार्च 2019 रोजी झालेल्या बिझनेस मिटिंगनंतर राज कुंद्रा न कळवता अचानक माझ्या घरी आला. फोनवर आमची कोणत्यातरी मुद्द्यावरून चॅटिंगमध्ये वाद झाला होता. त्यानंतर राज कुंद्रा घरी पोहचला आणि जबरदस्तीने मला किस करू लागला. शर्लिनने त्याला मागे खेचण्याचा खूप प्रयत्न केला. पण राजने ऐकलं नाही, असं शर्लिननं म्हटलं. मला भिती वाटली. थोड्या वेळानं शर्लिननं कसं तरी राजला ढकललं आणि वाॅशरूमच्या दिशेने पळाली, असं शर्लिननं निवेदनात म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“अजितदादांनी भाषेबद्दल बोलणं म्हणजे, राज कुंद्रांनी कुठला पिक्चर बघावा हे सांगण्यासारखं”
शिववडा, शिवथाळीच्या अद्भूत यशानंतर आता शिव भिंत; अतुल भातखळकरांचा टोला
“सांगलीकरांच्या चिंतेत वाढ! कृष्णेची पाणी पातळी वाढणार, पुढच्या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज”
चंद्रकांत पाटलांना भाषणाच्या क्लिप पाठवल्या नाहीत, बैल मुततो तशा भूमिका बदलत नाही- राज ठाकरे