पंढरपूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात सभा घेतली आणि संपूर्ण देशात या सभेची चर्चा झाली. त्यानंतर परवा दिवशी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पंढरपुरात भर पावसात सभा घेतल्याने पुन्हा चर्चेला उधाण आलं. काल पंढरपुरातही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे भाजपलाही पंढरपुरात फडणवीसांच्या सभेत जोरदार पावसाच्या चमत्काराची आस लागली आहे.
काल देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांच्यासाठी 6 सभा घेतल्या. कासेगाव, गाढेगाव आणि पंढरपुरात या सभा झाल्या. मात्र, पंढरपुरमध्ये सभा सुरू असताना अचानक पाऊस सुरू झाला. थेंब थेंब पावसाने हजेरी लावले. मात्र, वारं प्रचंड सुटलं होतं. वादळामुळे ढग पुढे सरकल्यानं जोरदार पाऊस पडला नाही. मात्र, पावसाची रिमझिम सुरू असतानाही फडणवीस बोलत होते आणि पंढरपूरकरही सभेच्या ठिकाणी बसून होते. कुणीही चुळबुळ केली नाही. सर्वजण भाषण ऐकण्यात तल्लीन झाले होते. मात्र, पाऊस जोरदार न झाल्यानं भाजप नेत्यांचा चांगला हिरमोड झाला. त्यामुळे पवारांसारखेच फडणवीसही भर पावसात सभा करणारे योद्धे आहेत, असं म्हणण्याचे भाजपचं मनसुभेही उधळले गेले.
दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढ्यातील भाजप उमेदवार समाधान आवताडे यांनी फडणवीसांचा हा फोटो शेअर करत अपने संघर्षों की तारीख़ें आबाद रखेंगे, लड़ाई ऐसे लड़ेंगे की विरोधी भी याद रखेंग़े ! असं ट्विट करत समाधान आवताडेंनी विरोेधकांना टोला लगावला.
अपने संघर्षों की तारीख़ें आबाद रखेंगे ,
लड़ाई ऐसे लड़ेंगे की विरोधी भी याद रखेंग़े !@Dev_Fadnavis @ChDadaPatil @Harshvardhanji @RamVSatpute pic.twitter.com/cls54EsQvb— समाधान दादा आवताडे (@autadesamadhan1) April 12, 2021
महत्वाच्या घडामोडी –
जे राजकारण सुरू आहे त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, लोकांचा जीव महत्त्वाचा- आदित्य ठाकरे
कर्णधार संजू सॅमसनची आक्रमक शतकी खेळी व्यर्थ; पंजाब किंग्सचा शेवटच्या चेंडूवर विजय
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ‘सीबीआय’चं समन्स; 14 एप्रिलला होणार चौकशी