आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून कारवाई केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. यावरच अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून नाराजी व्यक्त केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“आयटीने कुणावर छापेमारी करावी हा त्यांचा अधिकार आहे, शंका-कुशंका आल्यावर छापेमारी करु शकतात. माझ्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांवर छापेमारी झाली आहे. मी नियमित टॅक्स भरतो, अर्थमंत्री असल्याने आर्थिक शिस्त कशी लावायची, कुठलाही कर कसा चुकवायचा नाही, टॅक्स कसा भरायचा असतो हे मला चांगलं माहिती आहे, माझ्या कंपन्यांचा टॅक्स वेळच्या वेळेला भरला जातो, तरीही राजकीय हेतूने ही धाड टाकली की काय माहिती हवी होती हे इन्कम टॅक्सलाच माहिती, असं अजित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार साताऱ्यातील जरंडेश्वर, दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याचं कळत आहे. हे सर्व साखर कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे असल्याचं कळत आहे.
महत्वाच्या घडामोडी –
भाजप ठरला नंबर 1 चा पक्ष; पण मनसेची साथ हवीच?
शिवसेनेची अवस्था अत्यंत दयनीय, त्यांना चौथ्या क्रमांकावर जावं लागलं; प्रविण दरेकरांची टीका
लखीमपूर घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक