“नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्याला राहुल गांधींचा हिरवा कंदिल”

0
471

नवी दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपुर्वी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुक स्वबळावर लढवण्याची भाषा केली होती. याच पार्श्वभूमीवर आता नाना पटोले यांनी काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांची आज भेट घेतली आहे.

नाना पटोले यांच्यासह महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के पाटील यांनी आज राहुल गांधी यांच्या निवासस्थानी भेट घेतली,  या भेटी वेळी नाना पटोले यांनी राहुल गांधी यांना स्वबळावर काँग्रेस लढल्यास कसा फायदा होऊ शकतो, याबाबत चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. या भेटी वेळी या नेत्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी नानांच्या स्वबळाच्या नाऱ्याला हिरवा कंदिल दिल्याचं सध्या स्पष्ट झालं आहे, त्यामुळे आता काँग्रेस पक्ष येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढेल, असं आता दिसुन येत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मी ‘सामना’ वाचत नाही, उगाच सुर्यावर थूंकू नका; नाना पटोलेंचा घणाघात

“सरकार चालवता येत नाही म्हणून सर ‘कार’ चालवतात”

पालकमंत्री बदला सांगली जिल्हा वाचवा; निलेश राणेंची जयंत पाटलांवर टीकास्त्र

फोन टॅपिंग मोदींच्या नव्हे, तर मनमोहन सिंग यांच्या काळातील- देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here