चेन्नई : IPL 2021 हंगामातील 16 वा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. या सामन्यात पंजाब किंग्जने 9 विकेट्सने विजय मिळवला.
इंडियन्सचा संघाने प्रथम फलंदाजी करत पंजाब किंग्ज समोर 132 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान पंजाबने 17.4 षटकात केवळ 1 विकेट गमावत सहज पार केले.
पंजाबकडून मयंक अगरवाल आणि कर्णधार केएल राहुल सलामीला फलंदाजीला उतरले होते. या दोघांनीही पंजाबला 53 धावांची सलामी देत चांगली सुरुवात करुन दिली. अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाल्यानंतर मयंक बाद झाला. त्याला राहुल चाहरने बाद केले.
तुम्ही हे वाचलंत का?
चंद्रकांत पाटील तुम्ही पुण्याचे सेवक आहात की पुनावालाचे?; नाना पटोलेंचा हल्लाबोल
यानंतर राहुल आणि ख्रिस गेल यांनी एकही विकेट जाऊ देता नाबाद 79 धावांची भागीदारी केली. त्यामुळे पंजाबने 18 व्या षटकातच 132 धावा करत विजयाला गवसणी घातली.
केएल राहुलने 52 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारासह नाबाद 60 धावा केल्या. तर ख्रिस गेलने 35 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 43 धावा केल्या.
दरम्यान, पंजाबकडून मोहम्मद शमी आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर दीपक हूडा आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी 1 विकेट घेतली. तर मुंबईकडून राहुल चाहरने 1 विकेट घेतली
महत्वाच्या घडामोडी –
“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरूण निगवेकर यांचं दीर्घ आजारानं निधन”
ऑक्सिजनसाठी सातारा-कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर टँकर अडवला; दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद
ऑक्सिजनसाठी सातारा-कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर टँकर अडवला; दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद